Home औद्योगिक शाहरूख खानने केली टाइडची शिफारस

शाहरूख खानने केली टाइडची शिफारस

20 second read
0
0
22

no images were found

शाहरूख खानने केली टाइडची शिफारस

 

 

 

मुंबई,  – टाइड या जगातील नं. 1 डिटर्जंट ब्रँडकडे जगातील सर्वोत्तम लाँड्री सोल्यूशन उपलब्ध करून देण्याची परंपरा राखत एका खास भागीदारीबद्दल एक रोमांचक बातमी आहे. गेल्या 10 वर्षांत टाइडने इनोव्हेशनवर लक्ष केंद्रीत करत टाइड मॅटिक लिक्विड आणि टाइड पॉड्स (पीओडीएस) ही उत्पादने सादर केली आहेत. ग्राहकांच्या बदलत्या सवयी म्हणजे कपड्यांपासून ते खानपानाच्या आवडीनिवडीपर्यंत आणि विविध प्रकारचे डाग व जीवनशैलीनुसार बदल करून ग्राहकांना समाधानी करणे हे टाइडचे वचन आहे.

      या बदलांना प्रतिसाद देत टाइड वाढीव मॅग्नेट्ससह नवे व सुधारित व्हर्जन सादर करत आहे. चहा, कॉफी, तेल, रस्सा यांचे चिवट डाग काढून स्वच्छतेची खात्री देण्याच्या दृष्टीने हा प्रगत फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. यामुळे चिवट डाग निघतातच, त्याचप्रमाणे तुमचे कपडे दीर्घकाळ ताजे राहतात. कपडे हाताने वा मशीनमध्ये धुण्यासाठी सुयोग्य अशा प्रकारे टाइडची रचना करण्यात आली आहे, जेणेकरून तुमच्या कपड्यांमध्ये असामान्य सफेदी आणि ताजेपणा राखला जाईल. 

         या प्रयत्नात टाइट या आयकॉनिक ब्रँडने शाहरुख खान या एका लोकप्रिय अभिनेत्याशी भागीदारी केली आहे. या भागीदारीच्या माध्यमातून चाहते आणि ग्राहक अशा दोघांनाही आनंद देण्याचे संयुक्त वचन देण्यात आले आहे. किंग खानचा परफेक्शन आणि निर्विवाद उत्कृष्टतेचा अथक प्रयत्न हे पैलू टाइडच्या ग्राहक वचनाचा आधारस्तंभ आहेत. न्यू आणि इम्प्रूव्ह्ड टाइडने एका संस्मरणीय नव्या कॅम्पेनमधून ही संयुक्त वचबद्धता जिवंत केली आहे.

        आयकॉनिक शाहरुख खानशी केलेली भागीदारी हा या परिवर्तनकारी लाँचचा गाभा आहे. टाइड ही ‘अस्सल/रिअल एसआरके – स्टेन रिमुव्हल किंग’ आहे हे सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा सुपरस्टार टाइड इंडिया ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून जोडला गेला आहे. या भागीदारीबद्दल किंग खान म्हणाला, “टाइडसोबतचा हा सहयोग फक्त ब्रँड एन्डॉर्सपर्यंतच मर्दादित नाही तर परफेक्शन आणि उत्कृष्टता साध्य करण्याचा हा संयुक्त निर्धार आहे. अशा प्रकारची पहिलीवहिली भागीदारी केल्याबद्दल आणि टाइड हा ‘अस्सल/रिअल एसआरके’ असल्याची शिफारस करताना मला आनंद होत आहे. टाइडचा न्यू व इम्प्रूव्ह्ड परफॉरमन्स आणि डाग घालविण्याची त्याची क्षमता यामुळे कपडे धुण्याबाबतीत ग्राहक नक्कीच समाधानी होतील.”

     चित्रीकरणाचा अनुभव सांगताना किंग खान म्हणाला, “टाइडचा तो आयकॉनिक ‘स्वूश’ आणि ‘चौक गये’ अनेकदा पाहिला आहे. ब्रँडतर्फे देण्यात येणारी असामान्य स्वच्छता त्यामुळे कायम लक्षात राहते. याचा एक भाग होणे आणि माझ्या पद्धतीने ते सगळे जिवंत करणे हा खूपच रंजक अनुभव होता. यात फक्त रंजक पैलू नाहीत तर टाइडच्या डाग काढण्याच्या कौशल्याचेही प्रात्यक्षिक दिसते.”

     या भागीदारीबद्दल पीअँडजी इंडियाच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर आणि पीअँडजी इंडियाच्या फॅब्रिक केअर विभागाच्या कॅटेगरी हेड मुक्ता महेश्वरी म्हणाल्या, “पीअँडजीकडे जगातील नं. 1* डिटर्जंट ब्रँड आहे आणि ब्रँडच्या प्राधान्याला चालना देणाऱ्या उत्कृष्टतेसह ग्राहकांच्या दैनंदिन गरजांची पूर्तता करणे हा या ब्रँडचा निर्धार आहे. शाहरुख खानशी भागीदारी केल्याचा आणि न्यू व इम्प्रूव्ह्ड स्टेन रिमुव्हल किंग म्हणून त्याने हा ब्रँड एन्डॉर्स केल्याचा आम्हाला आनंद आहे. जगातील नं. 1 डिटर्जंट ब्रँडने ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या गरजेची पूर्तता करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमध्ये सखोल डाग काढून चिवट डाग स्वच्छ करण्याची क्षमता टाइडला आता प्राप्त झाली आहे, याबद्दल आम्ही रोमांचित आहोत. देशभरातील ग्राहक व चाहत्यांना ‘टाइडच अस्सल/रिअल एसआरके’ असल्याची शिफारस एसआरके करत असल्याचा आम्हाला आनंद आहे.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In औद्योगिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…