Home सामाजिक हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून एक लाख रुपयेची मदत.

हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून एक लाख रुपयेची मदत.

0 second read
0
0
104

no images were found

हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून एक लाख रुपयेची मदत.
कोल्हापूर : महाराष्ट्राचे नामवंत पैलवान हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांचा भोगावती येथील कुस्ती मैदान पाहून येताना अपघात झाला. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून उपचारासाठी एक लाख रुपये मदत करण्यात आली. दरम्यान राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची विचारपूस केली. क्षीरसागर यांनी त्यांना धीर दिला. यापुढेही सर्वतोपरी मदत करण्याचेही ग्वाही दीनानाथ सिंह यांना त्यांनी दिली. अपघात झाल्याचे समजताच राजेश क्षीरसागर यांनी कार्यालयामधून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अर्ज पाठवला. त्यानुसार तातडीने निधी मंजूर करून पुढील उपचार करण्यात आले. सरकारने केलेल्या मदतीबद्दल दीनानाथ सिंह यांच्या नातेवाईकांनी आभार व्यक्त केले.
यावेळेस शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख प्रशांत साळुंखे, माजी नगरसेवक राहुल चव्हाण उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …