
no images were found
टिकटॉक फेमस सोनाली फोगाट काळाच्या पडद्याआड
सोनाली यांनी छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. सोनाली फोगट यांचे हृदय विकाराने निधन झालं आहे. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्धीस आलेल्या सोनाली फोगाट यांचा ‘बिग बॉस रिअॅलिटी शो’च्या 14 व्या सीझनमध्येही सहभागी होता. सोनाली फोगट यांची भाजपच्या हरियाणा युनिटने महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. भाजप नेता आणि अभिनेत्री तसेच टिकटॉक स्टार म्हणूनदेखील प्रसिद्ध होत्या. हिसार जिल्ह्यातील आदमपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळाली होती. या निवडणुकीत काँग्रेसचे नेते कुलदीप बिश्नोई हे उमेदवार सोनाली फोगाट यांना पराभूत करून विजयी झाले होते. हृदय विकाराने सोनाली फोगट यांचे निधन झाले.