
no images were found
वास्कोत भरदुपारी तरुणाचा निर्घृण खून; दोघांना अटक
वास्को – काटेबायणा येथे सोमवारी भर दुपारी चारजणांनी चौघांनी कोयता व चाकूचे वार करून उमेश हरिजन या तीस वर्षीय युवकाचा निर्घृण खून केला. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली. चार संशयितांपैकी दोघांना फोंडा पोलिसांना पाठलाग करून ताब्यात घेऊन मुरगाव पोलिसांकडे सोपविले.
उमेश हा सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास बायणातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात आला होता. तेथे श्रीचे दर्शन घेऊन महापूजेचा महाप्रसाद जेवल्यावर तो निघाला. त्यावेळी त्याच्यासोबत त्याचा मित्र अशोक चलवादी होता. ते काटेबायणा येथील उड्डाणपुलाजवळ पोहोचले असता तेथे दबा धरून असलेल्या काहीजणांनी त्यांना अडविले. त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद सुरू झाल्यावर त्या चौघाजणांनी उमेश याला उड्डाण पुलाखाली नेले. तेथे संशयिताने पाठीवर कोयत्याने वार केला. त्यानंतर इतरांनी हत्यार्यांमनी सपासप वार केले. धारदार कोयते व चाकूचे वार झाल्याने उमेश तेथेच गंभीर जखमी होऊन पडला. अशोक याने उमेश याला सोडविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्याला धमकी देण्यात आल्याने तसेच त्या हल्लेखोरांच्या हातात हत्यारे पाहताच अशोक तेथे लपला. त्याने सदर घटनेची माहिती उमेश याच्या भावाला दिली.
उमेशचा भाऊ विजय हा तेथे कार घेऊन येईपर्यंत त्या हल्लेखोरांनी घटनास्थळाहून पळ काढला गंभीर जखमी झालेल्या उमेशला उपचारासाठी चिखली उपजिल्हा इस्पितळामध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वास्कोतील खून प्रकरणातील दोन संशयितांना फोंडा पोलिसांनी संध्याकाळी फिल्मी स्टाईलने पकडले. खून करून पळालेल्यांपैकी दोघेजण स्कूटरवरून फोंड्याच्या दिशेने आल्याची माहिती वास्कोतील पोलिसांनी फोंडा पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी बाणस्तारी येथे नाकाबंदी केली.यावेळी एका स्कूटरवरील दोघास्वारांनी ही नाकाबंदी तोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, फोंडा पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला; पण दोघांनीही स्कूटरवरून जुने गोवेच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न केला असता पाठलाग करीतच पोलिसांनी या दोघांनाही जुने गोवे येथे गाठले व ताब्यात घेतले. हे दोघेहीजण बायणा – वास्को येथील रहिवासी असून, त्यांची नावे अमीर हुसेन व दीपक साहनी अशी आहेत.