
no images were found
पर्यावरण पूरक गणेश मूर्ती विसर्जन
कोल्हापूर प्रतिनिधी : न्यू पॉलिटेक्निक सोशल क्लब आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण पूरक गणेश मूर्ती विसर्जन आणि निर्माल्य संकलन उपक्रम झाला. यासाठी शाहू मिल समोर विसर्जन कुंड ठेवले होते. त्यात विसर्जित झालेल्या गणेश मूर्ती महापालिकेकडे सुपूर्त केल्या. सुमारे 200 मूर्तींचे पर्यावरण पूरक विसर्जन करून त्या प्रशासनाला दिल्या. या उपक्रमाला महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, न्यू पॉलिटेक्निकचे संचालक नलवडे साहेब काही माजी विद्यार्थ्यांनी भेट दिली. न्यू पॉलिटेक्निकच्या सोशल क्लब च्या आवाहनाला प्रतिसाद देत भाविकांनी गणेश मूती कुंडात विसर्जन करून तेथेच उभ्या असणाऱ्या महापालिकेच्या ट्रॅक्टर आणि ट्रकमध्ये मूर्ती ठेवल्या जात होत्या. निर्माल्य संकलनाची व्यवस्था अवनी संस्थेने केली होती. या उपक्रमास सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे प्राध्यापक सुभाष यादव, लॅब असिस्टंट एकनाथ पाटील तसेच क्लबचे स्वयंसेवक विद्यार्थी, विद्यार्थिनी कोमल हंगे,आकांक्षा देसाई, सिद्धी घोटणे, श्रेयश चव्हाण, आदित्य बोंगाळे, शैलेंद्र सावंत, गौरी सोनवणे, प्रतीक पाटील, प्रशिका कांबळे आधी सहभागी होते सोशल क्लबचे प्रा. रविंद्र यादव यांनी नियोजन केले सदर उपक्रमास प्राचार्य डॉ. एस. एच. दाभोळे आणि चेअरमन मा. के.जी पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.