Home सामाजिक इंजिनला लागून असलेले २ डबे घसरले  

इंजिनला लागून असलेले २ डबे घसरले  

0 second read
0
0
122

no images were found

इंजिनला लागून असलेले २ डबे घसरले  

नागपूर :  सोमवारी पहाटे कोरबा इतवारी शिवनाथ एक्सप्रेस पहाटे पावणे चार वाजता डोंगरगड रेल्वे स्थानकाच्या यार्ड परिसरात इंजिनला लागून असलेले दोन डबे घसरले. कोरबाहून नागपूरकडे येत असलेल्या शिवनाथ एक्सप्रेसचे दोन डबे डोंगरगड (छत्तीसगड) येथे घसरले. डबे घसरून झालेल्या या अपघातात पहाटे झोपेत असलेले प्रवासी धक्का लागून किरकोळ जखमी झाले. धक्का लागल्यामुळे काही प्रवासी बर्थ वरून खाली पडून त्यांना किरकोळ दुखापत झाली. रेल्वे प्रशासन तातडीने घटनास्थळी पोहोचले. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना त्या डब्यातून खाली उतरवून इतर डब्यात त्यांची व्यवस्था केली. नंतर दोन्ही डबे गाडीपासून वेगळे करून गाडी राजनांदगावकडे सकाळी ५.४५ वा. रवाना करण्यात आली. या गाडीला तेथे दोन डबे जोडण्यात आले. नंतर त्या प्रवाशांना परत त्या दोन डब्यामध्ये बसवण्यात आले आणि ही गाडी इतवारीच्या दिशेने रवाना करण्यात आली. या दुर्घटनेत कोणालाही मोठी दुखापत झाली नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सु…