
no images were found
मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त होणार : मुख्यमंत्री शिंदे
मुंबई : मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्यावर विधानसभेत चर्चा करण्यात आली. तसेच, पुढील २ वर्षात मुंईत खड्डे शोधूनदेखील सापडणार नाही. मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून रस्ते खड्डे मुक्त करणार असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबतही बैठक झाली. यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणार अशी घोषणा करत मुंबईतील ६०३ किलोमीटर रस्त्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.