no images were found
झी सिनेमा ख्रिसमस स्पेशलः “डॉक्टर जी” चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर
मस्त मनोरंजक चित्रपट “डॉक्टर जी” च्या सोमवार, 25 डिसेंबर रोजी 8 वाजता वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअरसोबत सणासुदीचा आनंद पसरवण्यासाठी झी सिनेमा वाहिनी सज्ज आहे. अनुभूती कश्यप दिग्दर्शित आणि जंगली पिक्चर्स निर्मित “डॉक्टर जी” मध्ये आयुषमान खुराणा, रकुल प्रीत सिंग आणि शेफाली शाह अशा एक से एक कलाकारांच्या भूमिका आहेत. एक मस्त कॉमेडी नाट्य असलेला हा चित्रपट डॉ.उदय गुप्ताबद्दल असून ही भूमिका आयुषमानने मस्त साकारली आहे. ऑर्थोपेडिक्समध्ये करिअर करण्याचे स्वप्न बाळगलेल्या उदयला अखेर गायनॉकॉलॉजीच्या जगतात प्रवेश करावा लागतो.
गायनॉकॉलॉजी हे क्षेत्र सर्वसाधारणपणे स्त्रियांसाठी असल्याचे मानले जाते. त्यामुळे जेव्हा उदय त्याच्या मनाविरोधात एक गायनॉकॉलॉजिस्ट बनतो, तेव्हा त्याला ते स्वीकारण्यासाठी आणि त्यानुसार स्वतःला बनवण्यासाठी अनेक कठीण समस्यांना सामोरे जावे लागते, जसे त्याची आई चित्रपटात म्हणते, “बनने गया था ऑर्थो का डॉक्टर, बन गया औरतों का डॉक्टर”. त्यातून मग निर्माण होते आत्मशोध, दोस्ती आणि आयुष्याच्या अनपेक्षित वळणांची मनाला भावणारी पण विनोदी कथा. गायनॉकॉलॉजीच्या क्षेत्रातील उदयच्या प्रवासात त्याला अनेक थक्क करणाऱ्या घटना आणि अनपेक्षित वळणांना सामोरे जावे लागते. ह्या चित्रपटातून विनोदी पद्धतीने एक सकारात्मक संदेश प्रदान केला जातो आणि त्यामुळे ह्या सुट्टीच्या दिवसांमध्ये हा एक परफेक्ट फॅमिली वॉच आहे.
एक डॉक्टर म्हणून आपले महत्त्व जेव्हा उदयला समजायला लागते तेव्हा ह्या कथेमध्ये एक महत्त्वपूर्ण वळण येते आणि मग अनपेक्षित मैत्री आणि आत्मशोधाचा प्रवास सुरू होतो. “डॉक्टर जी” हा केवळ एक विनोदी चित्रपट नसून हा प्रेक्षकांना आपलाशा वाटेल असा मनाला भावणारा चित्रपट आहे. हा नक्कीच एक मस्त अनुभव आहे जो तुम्हांला खळखळून हसवेल आणि तुम्हांला एक सकारात्मक संदेशही देईल.