
no images were found
राष्ट्रवादी शिबिराच्या प्रसिद्धीपत्रकात नावच नाही
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन शिबिर मुंबईत होत असून या शिबिराला अजित पवार उपस्थित राहणार नाहीत.त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
घाटकोपरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय कार्यकर्ता शिबिर होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर होणार आहे. मात्र, कार्यक्रमाच्या प्रसिद्धीपत्रकात कुठेही अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख नाही. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबिर पार पडणार आहे. या शिबिराचे उद्घाटन जयंत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या शिबिराला खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र, या कार्यक’म पत्रिकेत अजित पवार यांचे नाव नसल्यामुळे विविध चर्चा सुरू आहेत. या शिबिरासाठी मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन हजारांहून अधिक प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पूर्वनियोजित कार्यक्रमांसाठी ते दिवसभर पुण्यात असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हे कार्यकर्ता शिबिर पूर्वीच ठरले होते. मात्र, भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे ते रद्द करण्यात आले होते. तेव्हाही अजित पवारांचे नाव प्रसिद्धीपत्रकात नव्हते आणि ते शिबिराला येणार नव्हतेच, असेही राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले.