no images were found
राजा रयतेचा’ संगीतमय प्रयोगाला कोल्हापूरकरांची भरभरुन दाद
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत 35 कलाकारांनी सादर केलेल्या; राजा रयतेचा; प्रयोगाला कोल्हापूरकरांनी भरभरुन दाद दिली. सुमित साळुंखे दिग्दर्शित ‘राजा रयतेचा’ या नृत्य, नाट्य, संगीतमय कलाविष्कार प्रयोगातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणींना उजाळा देण्याबरोबरच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना कलेतून मानवंदना देण्यात आली.
या प्रयोगादरम्यान कलाकारांनी शिवजन्म सोहळा, पावनखिंड रणसंग्राम, शिवराज्याभिषेक सोहळा आदी प्रसंगांचे सादरीकरण करत शिवकालीन प्रसंग डोळ्यासमोर जागे केले. यावेळी सादर केलेल्या विविध लोककलांना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. धनंजय जोशी यांनी उत्कृष्ट निवेदनातून कार्यक्रमात रंगत आणली. श्रीजा कला संस्कृती फौंडेशनचे चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमाची उत्तम निर्मिती केली. स्टार सिंगर श्रावणी महाजन यांनी सादर केलेल्या लावण्या व विविध गीतांना प्रेक्षकांनी टाळ्या व शिट्ट्यांच्या गजरात दाद दिली.
यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित श्रीमंतयोगी या कार्यक्रमाची दिग्दर्शक सुमित साळुंखे यांनी घोषणा केली.