no images were found
मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज करावेत
कोल्हापूर : मिलिटरी भरती परीक्षा पुर्व प्रशिक्षणाकरिता इतर मागसवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन 2023-24 वर्षामध्ये मिलिटरी भरतीच्या पुर्व तयारीसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी पध्दतीने महाज्योती, नागपूर यांच्यामार्फत प्रशिक्षण
देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत. अर्ज करताना अडचणी आल्यास अथवा इतर चौकशीकरिता 0712-2870120/21 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.
नॉनक्रिमिलेअर उत्पन्न गटातील इयत्ता 12 वी उत्तीर्ण अथवा प्रवेशित विद्यार्थ्यांना योजनेकरीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येईल. योजनेतंर्गत लाभार्थ्यांना मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण तसेच लेखी व शारीरिक परीक्षांच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षण 6 महिन्यांचे अनिवासी व ऑफलाईन पध्दतीचे असणार असून यासाठी विद्यार्थ्यांना दरमहा 10 हजार रु. विद्यावेतन देण्यात येणार आहे.