
no images were found
चुकीचा निर्णय दिला तर अध्यक्षांविरोधातही सर्वोच्च न्यायालयात जाऊ; उद्धव ठाकरे
मुंबई : आमच्याकडून पक्ष आणि पक्ष चिन्ह काढून घेतल्याने आम्ही निवडणूक आयोगाच्या विरोधात कोर्टात गेलो. सर्वोच्च न्यायालयाने ‘त्या’ 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. अध्यक्षांनी न्यायालयाच्या चौकटीत राहून निर्णय घेणे अपेक्षित आहे.मात्र अध्यक्षांनी असे न केल्यास आम्ही न्यायालयात जावू, आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत, असा इशारा देतानाच त्यानंतर जी बदनामी होईल, त्यामुळे यांना जगात तोंड दाखवायाल जागा राहणार नाही. अध्यक्षांनी परदेशातून यावं आणि निकाल लावावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात सध्या बेबंदशाही माजवली जात आहे. राज्याची जगात बदनामी होत आहे. मात्र न्यायालयाने काल या सरकारचा खोटारडा चेहरा दाखवून दिला. या निर्णयामुळे सरकारला तात्पुर्त जीवदान मिळालेलं आहे. मी राजीनामा दिल्याने निर्णय देता येत नाही असे सांगण्यात आले मात्र मी नैतिकतेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असून मी माझ्या निर्णयावर मी समाधानी आहे. काही जणांनी काल आनंदोत्सव साजरा केला. भाजपने आनंद साजरा केला ते समजू शकतो. कारण डोईजड झालेलं ओझं उतवरण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला. पण गद्दारांना आनंद होण्याची गरज काय? असा खोचक सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.
काल सर्वोच्च न्यायालयाने पक्षातील एक गट आम्हीच पक्ष म्हणून दावा करू शकत नाही, असे स्पष्ट केले आहे. त्या मुद्यावर आम्ही पुन्हा निवडणूक आयोगाकडे गेलो आहोत. तसेच ‘त्या’ 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यासाठी न्यायालयाने चौकट घालून दिली आहे. तसेच ठरावीक वेळेत तो निर्णय घेणे अपेक्षित आहे. तसे न झाल्यास आम्ही अध्यक्षांच्या विरोधात देखील न्यायालयात जावू, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.