no images were found
पीएम किसान ‘या’ योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ‘हे’ काम त्वरित करा
शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी संलग्न नाही, त्यांनी त्वरित गावातील पोस्ट ऑफिसमध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे खाते उघडून घ्यावे
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रूपये मिळतात.ही रक्कम दोन हजार रुपयांच्या तीन टप्प्यांमध्ये मिळते. ही योजना सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांना अद्याप १३ हप्ते वितरित झाले आहेत. या हप्त्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.
अजून काही शेतकऱ्यांची आधार जोडणी बाकी आहे. त्यामुळं या शेतकऱ्यांना पुढील हप्ता म्हणजे १४ वा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होणार नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी गावातील पोस्टात बँक खात्याला आधार नंबर जोडून घ्यावा, असे आवाहन येथील प्रवर डाक अधीक्षक एम. डी. पाटील, सहायक डाक अधीक्षक विजय कदम यांनी केले आहे.
आधार नंबर संलग्न करण्याची मुदत १५ मेपर्यंत आहे. त्यामुळे तातडीने पोस्टात खाते उघडून आधार नंबर संलग्न केल्यास जमा झालेले पैसे काढण्यासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता भासणार नाही. गावातील पोस्ट ऑफिसमधूनच पैसेही काढता येतील. ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी संलग्न नाही, त्यांनी त्वरित गावातील पोस्ट ऑफिसमध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे खाते उघडून घ्यावे. हे खाते उघडण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकेत जाण्याची गरज नाही. त्यांच्या गावातील पोस्ट ऑफिसमधून हे खाते उघडता येईल. आधार व मोबाइल नंबर देऊन खाते उघडता येईल.