
no images were found
संजय राऊत यांचा मुख्यमंत्री यांच्यावर मोठा हल्ला !
नवी दिल्ली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर मोठा हल्ला केला आहे. मनी लॅन्ड्रींग कायद्याचा संदर्भ देत त्यांनी एकनाथ शिंदे यांना अटक होऊ शकते, असा दावा केला. देशात या पद्धतीने आतापर्यंत विरोधकांना ईडीने अटक केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुन्हेगारीचा पैसा स्विकारला आहे. यासंदर्भात भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे स्टेटमेंट आहे. गणपत गायकवाड म्हणतात, माझे कोट्यवधी रुपये एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. गणपत गायकवाड यांच्या आरोपानुसार आता त्याचा शोध घेतला पाहिजे. आमच्या माहितीनुसार, हा पैसा शंभर कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांना या प्रकरणात अटक करता येईल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
मनी लॅन्ड्रींग कायद्यानुसार या गुन्ह्यात पुरावा लागत नाही. या प्रकरणात स्टेटमेंट आले आहे. हे स्टेटमेंट हाच पुरावा असतो. त्यामुळे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितल्यानुसार आता किरीट्ट सोमय्या यांनी या प्रकरणात करवाईची मागणी करायला हवी. या कायद्याचा गैरवापर होत आहे. आता या प्रकरणात एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाई केली तर ईडीची भूमिका भ्रष्टचारविरोधी असल्याची स्पष्ट होईल.