Home मनोरंजन दोन सुपरस्टार असूनही बॉक्स ऑफिसवर ठरला अपयशी हा चित्रपट

दोन सुपरस्टार असूनही बॉक्स ऑफिसवर ठरला अपयशी हा चित्रपट

0 second read
0
0
26

no images were found

दोन सुपरस्टार असूनही बॉक्स ऑफिसवर ठरला अपयशी हा चित्रपट

चित्रपट कसाही असला तरी त्या चित्रपटाचं यश हे बॉक्स ऑफिसवरील आकड्यांवर ठरलेलं असतं. काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करतात तर काही चित्रपट हे सपशेल आपटतात. बॉलिवूडमध्येही असे कित्येक चित्रपट आहेत जे बॉक्स ऑफिसवर दणकून आपटले आहेत अन् ज्याचा निर्मात्यांना जबरदस्त फटकाही बसला आहे. पण आज आपण बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या फ्लॉप चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत.
या चित्रपटात निर्मात्यांनी अक्षरशः पाण्यासारखा पैसा ओतला पण अखेर प्रदर्शनानंतर चित्रपट सपशेल आपटला. १५ वर्षांपूर्वी हा बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झाला खरा पण चित्रपटगृहात मात्र तो फारकाळ टिकूही शकला नाही. २००९ साली आलेल्या अक्षय कुमार, संजय दत्त व झायेद खान यांच्या ‘ब्ल्यु’ या चित्रपटाबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत. मनोरंजनसृष्टीतील हा आजवरचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट ठरला आहे.
त्यावेळी अक्षय कुमारचं फिल्मी करिअर हे एका उंचीवर होतं, त्यामुळे ‘ब्ल्यु’च्या ट्रेलरनंतर याची प्रचंड हवा निर्माण झाली. परदेशातील लोकेशन्स आणि दमदार अॅक्शन असूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. समुद्रात बुडालेल्या एका जुन्या जहाजातील खजिन्याभोवती फिरणाऱ्या या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना अजिबात आवडली नाही.
या चित्रपटाचे बजेट होते ८५ कोटी. अक्षय कुमार, संजय दत्तसारखी मोठमोठी नावं जोडलेली असूनसुद्धा या चित्रपटाने जगभरात केवळ ६३ कोटींचा व्यवसाय केला. आपल्या बजेटएवढी रक्कमही वसूल न केल्यामुले बॉलिवूडचा हा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट ठरला. याच चित्रपटानंतर अभिनेता झायेद खानच्या करिअरला उतरती कळा लागली अन् चित्रपटसृष्टीतून तो दिसेनासा झाला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …