Home शासकीय भारतीय वायुसेनेत होणार महिला अग्निवीरांची भरती

भारतीय वायुसेनेत होणार महिला अग्निवीरांची भरती

4 second read
0
0
137

no images were found

भारतीय वायुसेनेत होणार महिला अग्निवीरांची भरती

हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी म्हणाले की, पुढील वर्षापासून महिला अग्निवीरांचीही वायुसेनेत भरती करण्यात येणार आहे. भारतीय लष्कर आणि नौद्लानंतर  आता महिला अग्निवीर म्हणून लवकरच भारतीय वायुसेनेत दाखल होणार आहेत. हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी म्हणाले की, पुढील वर्षापासून महिला अग्निवीरांचीही वायुसेनेत भरती करण्यात येणार आहे. वायुसेनेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, महिलांची भरती करण्यापूर्वी आम्हाला सर्व प्राथमिक व पायाभूत सुविधा तयार कराव्या लागतील तसेच महिला सैनिकांना कोणतीही अडचण येऊ नये, असे वातावरण तयार करावे लागेल. दरम्यान, या वर्षी वायुसेनेकडून 3000 अग्निवीरांची भरती करण्यात येणार आहे.

सध्या भारतीय वायुदलात अधिकारी पदावर महिला कार्यरत असल्या तरी एअरमन सैनिक रँकमध्ये महिलांचा अद्याप समावेश झालेला नाही. प्रथमच वायुसेनेत महिला सैनिक म्हणून रुजू होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील वर्षी 3500 अग्निवीरांची भरती होईल तेव्हा 3% महिलांसाठी राखीव असतील. यानंतर, दरवर्षी त्यात हळूहळू वाढ केली जाईल आणि चार वर्षांत ती 10% पर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे. त्यानंतर त्याचा आढावा घेऊन त्यानुसार किती टक्के महिलांची भरती करायची याचा निर्णय घेतला जाईल. वायुसेनेचे प्रमुख एअर चीफ मार्शल चौधरी म्हणाले की, या ऐतिहासिक प्रसंगी, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, सरकारने भारतीय वायुसेनेतील अधिकार्‍यांसाठी वेपन सिस्टम विंग तयार करण्यास मान्यता दिली आहे. तसेच पुढील वर्षापासून महिला अग्निशमन दलाचा समावेश करण्याचा विचार करत आहोत, असे वायुसेनी प्रमुख म्हणाले. या संदर्भातील पायाभूत सुविधांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे

एअरफोर्समध्ये एकूण 39 ट्रेड्स आहेत आणि महिला अग्निवीर कोणत्याही ट्रेडचा भाग असू शकतात. अग्निवीर म्हणून चार वर्षे पूर्ण केल्यानंतर ते कायमस्वरूपी वायुसेनेचा भाग बनतील. वायुसेनेत भरती होणार्‍या अग्निवीरांना सुरुवातीला कोणताही ट्रेड दिला जाणार नाही. वायुसेनेच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, आम्हाला कुणालाही एका ट्रेडपुरते मर्यादित ठेवायचे नाही, त्यामुळे चार वर्षे अग्निवीर असताना त्यांना सर्व प्रकारची कामे शिकवली जातील आणि त्या आधारे त्यांची चाचणी घेतली जाईल. चार वर्षे पूर्ण झाल्यावर, कायमस्वरूपी असणार्‍यांपैकी जास्तीत जास्त 25% एअरमन बनतील आणि त्यांना पुन्हा ट्रेड दिला जाईल. या 25% महिलांची संख्या पूर्णपणे गुणवत्तेवर अवलंबून असेल. महिला अग्निवीर कायमस्वरूपी होतील तेव्हा त्यांना एअरमन देखील म्हटले जाईल.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …