Home क्राईम वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसचा दुसरा अपघात

वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसचा दुसरा अपघात

0 second read
0
0
50

no images were found

वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसचा दुसरा अपघात

मुंबई : मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या हायटेक वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसला सलग दुसऱ्या दिवशी जनावरांनी धडक दिली. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही परंतु  सलग दुसऱ्या घटनेनंतर म्हशीं मालकाविरोधात रेल्वे पोलिसांनी रेल्वे अधिनियम १९८९ च्या कलम १४७ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 सप्टेंबर 2022 रोजी मुंबई ते अहमदाबाद दरम्यान अत्याधुनिक – हायटेक वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसला हिरवी झेंडा दाखवून प्रारंभ झाला होता. या गाडीला सुरू होऊन एक आठवड्या देखील पूर्ण झालेला नसताना  सलग दोनवेळा वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसला अपघात झाल्याचे दिसते. पहिला अपघात गुरूवारी झाला. ज्यामध्ये ट्रेन क्रमांक 20901 वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस मुंबईहून अहमदाबादला येत होती. यादरम्यान वटवा ते मणिनगर स्थानकाजवळ म्हशींचा कळप रेल्वे मार्गावर आला. वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसची आणि म्हशींची धडक होऊन या अपघातात चार म्हशी ठार झाल्या असून नव्या कोऱ्या वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसचे मोठे नुकसान झाले.

दरम्यान दुसरा अपघात शुक्रवारी घडला असून ट्रेन गांधीनगरहून मुंबईला जात होती. दुपारी ३ वाजून ४४ मिनिटांनी कंझरी ते आणंद दरम्यान एक गाय रेल्वे रुळावर आल्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेसची पुन्हा धडक झाली या दुर्घटनेत कोणतीही जीवित आणि वित्तय हानी झालेली नाही. मात्र,वंदे भारत एक्सप्रेस गाडीचा पुढील भाग तुटला आहे. या घटनेनंतर म्हशी मालकाविरोधात रेल्वे पोलिसांकडून रेल्वे अधिनियम १९८९ च्या कलम १४७ अंतर्गत  गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच रेल्वे रुळांजवळ जनावरे चरण्यास घेऊन जावू नयेत, याकरीता स्थानिकांची समजूत काढण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेचा अधिकाऱ्यांनी दिली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …