Home राजकीय बस दुर्घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट देणार

बस दुर्घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट देणार

0 second read
0
0
581

no images were found

बस दुर्घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट देणार

नाशिक : नाशिकमध्ये आज पहाटे खासगी प्रवासी बसचा मोठा अपघात झाल्याची घटना घडली. ट्रकच्या धडकेमुळे बसला भीषण आग लागून 11 जणांचा मृत्यू झाला तर जवळपास 38 जण अपघातात जखमी झाले. या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत देखील जाहीर केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकच्या दिशेनं रवाना झाले आहेत. नाशिकला जाण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. शिंदे आज बस दुर्घटनास्थळी भेट देणार आहेत.

जखमींवर उपचार करण्याला आमचे प्राधान्य असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ही मोठी दुर्घटना आहे. मृतांच्या नातेवाईकांना शासनाने पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जे लोक जखमी आहेत, त्यांच्या उपचाराचा खर्च शासन करणार असल्याचे व शासन त्यांच्या पाठिशी उभा असल्याचे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. आवश्यकता भासल्यास जखमींना मोठ्या रुग्णालयात देखील दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तत्काळ मदत पोहोचवण्याच्या मी सूचना त्या ठिकाणी दिल्या आहे. सकाळपासूनच मी नाशिकचे जिल्ह्याधिकारी, डॉक्टर, तेथील आयुक्त यांच्या संपर्कात होतो असेही शिंदे म्हणाले. जिल्हा प्रशासन यावर नजर ठेवून असल्याचेही शिंदे म्हणाले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…