
no images were found
दहीहंडी फोडताना जखमी झालेल्या प्रथमेशची झुंज अखेर अपयशी
मुंबई : दहीहंडी फोडताना गंभीर जखमी झालेल्या करी रोड येथील प्रथमेश सावंत या गोविंदाचा मृत्यू झाला. करी रोड येथील साईभक्त क्रीडा मंडळातील जखमी गोविंदाचा गेल्या दीड महिन्याहून अधिक काळापासून मृत्यूशी संघर्ष सुरू होता. मात्र, शनिवारी त्याची प्राणज्योत अखेर मालवली. केईएम रुग्णालयात त्याच्यावर सुरु उपचार होते.
करी रोड येथील साईभक्त क्रीडा मंडळातील जखमी गोविंदाचा गेल्या दीड महिन्याहून अधिक काळापासून संघर्ष सुरू होता. मात्र, आज (शनिवार) त्याची प्राणज्योत मालवली. केईएम रुग्णालयात त्याच्यावर सुरु उपचार होते. प्रथमेशला मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई काँग्रेस आणि शिवसेनेनं पुढाकार घेतला होता. मात्र, आज त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. प्रथमेशचे आई-वडील काही वर्षांपूर्वीच वारले होते. त्यामुळं चुलत्यांकडंच प्रथमेश वास्तव्याला होता. तो आयटीआयचे शिक्षण घेत होता. प्रथमेशच्या दुर्दैवी मृत्यू बद्धल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.