
no images were found
सक्शन कम जेटींग कम वॉटर रिसायकल मशिनरीद्वारे आजअखेर 164 मॅनहोल चेंबर साफ
कोल्हापूर : पूराचे पाणी ओसणा-या भागामध्ये व शहरातील मुख्य चेंबर लाईन साफ करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेस ठाणे, नवी मंबई व बृहन्मुंबई महापालिकेकडून सक्शन कम जेटींग कम वॉटर रिसायकल मशिनरी मागविण्यात आली आहेत. यासाठी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी या महापालिकेशी संपर्क करुन हि मशिनरी मागणी केली होती. या मशिनरीद्वारे आजअखेर शहरात 164 मॅनहोल चेंबर साफ करुन 35 टन गाळ, दगड व खरमाती चेंबरमधून काढण्यात आला आहे. यातील ठाणे व नवी मुंबई महापालिकेचे प्रत्येकी 1 मशिन दोन दिवसापुर्वी दाखल झाले असून बृहन्मुंबई महापालिकेची 2 मशिन काल रात्री कर्मचा-यांसह दाखल झाले आहे.
या मशिनद्वारे दिनांक 29 जुलै 2024 रोजी ठाणे महानगरपालिकेच्या मशीनद्वारे व्हीनस कॉर्नर ते गोकुळ हॉटेल पुढे नंदा पॅसेज त्यानंतर शाहूपुरी पाचवी गल्ली येथील 27 चेंबर व नवी मुंबई महानगरपालिका मशीनद्वारे रंकाळा रोड ते जुना वाशी नाका गटर लाईन आणि चॅनल अशी 17 चेंबर साफ करण्यात आले. तर तर दिनांक 30 जुलै 2024 रोजी ठाणे महानगरपालिकेच्या मशिनने ओमकार प्लाझा ते जगदाळे हॉल ते राजारामपुरी पाचवी गल्ली येथील 17 चेंबर व नवी मुंबई महानगरपालिकेच्या मशीनने भवानी मंडप ते शिवाजी चौक ते करवीर नगर वाचनालय आणि पुढे बिंदू चौक सबजेल पर्यंत 20 चेंबर साफ करण्यात आले आहेत. या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा व इतर घनकचरा चेंबर व मेन हॉलमधून काढण्यात आला आहे. तसेच आज बृहन्मुंबई महापालिकेच्या एका मशिनद्वारे खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदिर व दुसऱ्या मशिनद्वारे लक्ष्मीपुरी, धान्य बाजार या परिसरातील चेंबर साफ करण्यात आले. तर नवी मुंबई व ठाणे महापालिकेच्या मशिनद्वारे साईक्स एक्स्टेंशन व शाहूपुरी या भागामधील चेंबर साफ करण्यात आले. आज या चारही मशिनद्वारे 83 चेंबरची सफाई करण्यात आली आहे.
हि मोहिम प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, सहा.आयुक्त कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार व सर्व आरोग्य निरिक्षक यांनी राबविली.