
no images were found
नागरिकांच्या समस्यांचा पाठपुरावा करणार : जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे
कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्यावतीने नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी बांधिलकी अभियान राबवण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. यासाठी आपल्या परिसरातील नागरी प्रश्न, प्रशासनासंबंधीत प्रश्न अर्जाद्वारे भाजपा कार्यालयात दर मंगळवारी ४ ते ६ या वेळेत द्यावेत असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी केले आहे. या अभियानाची प्रानिनिधीक सुरुवात शुक्रवारी (ता.१२) राजर्षी शाहू महाराजांना वंदन करून दसरा चौक येथे दुपारी ४ ते ६ यावेळेत होणार आहे.
महापालिकेसह अन्य प्रशासनाशी संबंधीत प्रश्न दैनंदिन जीवनात भेडसावत असतात. रोजच्या व्यापात या प्रश्नांचा पाठपुरावा करणे सर्वांना शक्य होत नाही. त्यामुळे शासकीय कामांच्या विलंबाने त्रस्त नागरिकांना न्याय मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टीने हे बांधिलकी अभियान राबवण्याचा संकल्प केला असल्याचे जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी नमूद केले आहे. या अंतर्गत नागरिकांनी आपले प्रश्न अर्जाद्वारे पक्षाच्या बिंदू चौक कार्यालयात लेखी स्वरुपात द्यायचे आहेत. दर मंगळवारी ४ ते ६ या वेळेत हे अर्ज घेतले जातील. पाण्याचा प्रश्न, वाहतूक, वॉर्ड ऑफिसशी संबंधीत प्रश्न, आरोग्य, शिक्षण यातील समस्या नागिराकांनी द्याव्यात. भाजपतर्फे याचा पाठपुरावा करून संबंधीत विभागाकडून ही कामे तातडीने पूर्ण कशी होतील हे पाहिले जाणार आहे. यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष चिकोडे यांनी केले आहे.
चौकट :- या अभियानाची सुरवात म्हणून शक्रवार दिनांक १२ रोजी दुपारी ४ ते ६ यावेळेत भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे व भाजपा पदाधिकारी दसरा चौक येथे उपस्थित राहणार असून कोल्हापूर शहारातील नागरिकांनी आपल्या समस्या, शासकीय कामांचे, सामाजिक प्रश्नांचे निवेदन घेऊन उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी केले आहे.