Home मनोरंजन शेमारू मराठीबाणा वाहिनीची पहिली भव्य दिव्य मालिका जोगेश्वरीचा पती भैरवनाथ

शेमारू मराठीबाणा वाहिनीची पहिली भव्य दिव्य मालिका जोगेश्वरीचा पती भैरवनाथ

9 second read
0
0
44

no images were found

शेमारू मराठीबाणा वाहिनीची पहिली भव्य दिव्य मालिका जोगेश्वरीचा पती भैरवनाथ

 
मराठी मनोरंजन विश्वात अल्पावधीतच लोकप्रियता मिळवलेली वाहिनी शेमारू मराठीबाणा आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे एक भव्य दिव्य पौराणिक मालिका. साक्षात शंकराचा अंश असलेला भैरवनाथ आणि पार्वतीची परमभक्त जोगेश्वरी यांचे बंध कसे जुळले हे कथा म्हणजे जोगेश्वरीच्या पती भैरवनाथ हि मालिका. आजवर कोणत्याच माध्यमातून फारशी न उलगडलेली परंतू अतिशय उत्कंठावर्धक असलेली जोगेश्वरी-भैरवनाथाची हि कथा आता आपल्याला अनुभवता  फक्त आपल्या शेमारू मराठीबाणा या वाहिनीवर.. 
नागलोकाची राजकन्या जोगेश्वरी आणि स्मशानात रमणारा असा  भैरवनाथ हे एकत्र कसे येणार?, त्यांची लगीनगाठ कशी बांधली जाणार?  राकट असा भैरव जोगेश्वरीचं मनं जिंकू शकेल का? भैरवनाथ जोगेश्वरीच्या नात्याचे असे अनेक पदर या मालिकेच्या माध्यमातून उलगडले जाणार आहेत. अनेक  प्रकारच्या अद्भूत कथांनी भारलेलं चरित्र आहे शिवाच्या पाचव्या अवताराचं म्हणजेच भैरवनाथांचं. भैरव म्हणजे भयाचा नाश करणारी देवता. हातामध्ये त्रिशुळ,कपाळी भस्म, रंगीत मूर्ती आणि सोबतीला काळा कुत्रा असं भैरवनाथाचं रुप आपल्याला बघायला मिळतं. तर फुलाप्रमाणे नाजूक, सगळ्यांचं मन जपणारी, देवी पार्वतीची निस्सीम भक्त असलेली जोगेश्वरी. देवी पार्वतीच्या आशीर्वादाने जोगेश्वरीची इच्छा पूर्ण होणार पण भैरवनाथ जोगेश्वरीच मन जिंकण्यात यशस्वी होणार का हे पाहणं नक्कीच मनोरंजक असेल.  श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवाराच्या शूभदिनी ही जोगेश्वरीचा पती भैरवनाथ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वा. शेमारू मराठीबाणा वाहिनीवरुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
 
तर जोगेश्वरीची भूमिका साकारणारी क्षमा देशपांडे म्हणाली की, “आजवर जोगेश्वरी माता हे पात्र कोणत्याच मालिका किंवा चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेलं नाहीये. त्यामुळे आजवर कधीच चित्रीत न झालेलं हे पात्र साकारण्याची संधी मला मिळतेय ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. या मालिकेच्या माध्यमातून जोगेश्वरीदेवीची माहिती प्रेक्षकांना मिळणार आहे. या भूमिकेसाठी मी विशेष मेहनत घेतली आहे. जोगेश्वरी आणि भैरवनाथाच्या संसाराची ही अनोखी गोष्ट प्रेक्षकांना आवडेल याची मला खात्री आहे.” 
आजवर मराठीत अनेक उत्तमोत्तम आणि दर्जदार पौराणिक मालिका देणारे लेखक-दिग्दर्शक-निर्माते संतोष अयाचित यांनीच या मालिकेची निर्मिती केली आहे. 
श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवाराच्या शूभदिनी ही जोगेश्वरीचा पती भैरवनाथ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे आपल्या लाडक्या शेमारू मराठीबाणा वाहिनीवरून. 
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एचडीएफसी  बँकेने पटकावला ‘इंडियाज बेस्ट फॉर ‘एचएनडब्लू’ पुरस्कार

एचडीएफसी  बँकेने पटकावला ‘इंडियाज बेस्ट फॉर ‘एचएनडब्लू’ पुरस्कार   मुंबई,: युरोम…