
no images were found
जयंत पाटील यांना ईडीची नोटीस;चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय काही तासातच निकाल देणार आहे. आजच्या या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेलं आहे. अशातच जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवल्याने राजकीय वर्तुळात चर्चला उधाण आले आहे. राष्ट्रवादीवर दबाव टाकण्याचा हा प्रकार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. जयंत पाटील यांना ईडीची नोटीस बजावण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना धक्का बसला आहे.
आयएल आणि एफएस या कंपनीच्या व्यवहारांची ईडीकडून चौकशी सुरू होती. या कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली होती. या कंपनीच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता. या आधीही या कंपनी प्रकरणी राज ठाकरे यांनाही नोटीस पाठवण्यात आली होती. आर्थिक व्यवहारात अनियमितता होती. यात मनी लाँड्रिंग झालं आणि पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात अरुणकुमार साहा यांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. यामध्ये अनेक नावे समोर आली होती. त्यात जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे. त्यामुळेच ईडीने जयंत पाटील यांना नोटीस पाठवली आहे. मात्र, नोटीस पाठवल्याच्या वृत्तावर जयंत पाटील यांनी मात्र अद्याप अशी कोणती नोटी मिळाली नसल्याचं स्प्ष्ट केलं आहे.