no images were found
पर्यटकांनी भरलेली हाऊसबोट उलटून 20 जणांचा मृत्यू
मलप्पूरम : उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने किंवा लाँग विकेण्ड पकडून अनेक जण फिरायला गेले होते. मात्र या वेळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. केरळ राज्यातील मलप्पूरम जिल्ह्यातील तनूर परिसरातील तुवलथिरम समुद्र किनाऱ्यावर 30 लोकांनी भरलेली एक बोट उलटली.यामध्ये 20 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मृत्यूमध्ये अधिकतर मुलं असल्याची माहिती मिळाली आहे. पंतप्रधानांनी या घटनेबद्दल ट्विट करीत दुख: व्यक्त केले आहे. मृत्यू झालेल्या कुटुंबियांना दोन-दोन लाख देण्यात येणार असल्याची घोषणा देखील नरेंद्र मोदींनी केली आहे.
त्यावेळी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी शोक व्यक्त केला आहे. त्याचबरोबर एक पत्रक काढून मलप्पुरम जिल्हाधिकारी यांना शोध मोहिम सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अग्निशमन दल आणि पोलीस तुकड्या, महसूल आणि आरोग्य विभागाचे अधिकारी, त्याचबरोबर जिल्ह्यातील तनूर आणि तिरूर भागातील स्थानिक लोक बचाव कार्यात सहभागी झाले आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. राज्यमंत्री व्ही अब्दुरहमान यांनी माहिती दिली की केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा अपघात रात्री उशिरा झाला.
घटनास्थळी पोहोचलेले पोलिस या प्रकरणाच्या चौकशीत गुंतली आहे. घटना कशामुळे घडली आणि कशी घडली याची पोलिस चौकशी करीत आहेत. पोलिस अधिकाऱ्याने एका माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, ही घटना सायंकाळी सात वाजता घडली आहे. आतापर्यंत ज्या लोकांचे मृतदेह पाण्यात सापडले आहेत, त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जणांवरती उपचार देखील सुरु आहेत. दुर्घटना कशामुळे घडली याचं कारण अद्याप सापडलेलं नाही. पोलिस संपुर्ण प्रकरणाची चौकशी करीत आहे.