no images were found
कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाचे होणार नवा सर्व्हे
कोल्हापूर : कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाचे अंतर 28 कि.मी.ने वाढणार आहे, त्यासाठी दुसर्या बाजूने नव्याने सर्व्हे केला जाणार आहे.त्याची निविदा काढण्यात येणार असून, हे काम लवकरच सुरू होईल, असे मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक नरेश लालवाणी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कोल्हापूर-मिरज मार्गाच्या दुहेरीकरणाचे प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
लल्लन हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी कोल्हापूर रेल्वेस्थानकाची पाहणी करीत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचनाही केल्या. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाला २०१६-१७ मध्ये तत्कालीन रेल्वमंत्री सुरेश प्रभू यांनी मंजुरी दिली होती; मात्र त्यानंतर पुढे काहीच झाले नाही.
107 कि.मी.चे सर्वेक्षण यापूर्वी झाले आहे. यामध्ये घाटात एका बाजूला उंचवटा आणि एका बाजूला उतार आहे. त्यामुळे या मार्गावरील वक्रावर ग्रेडियंटचे तीव्र बदल टाळावे लागणार आहेत. याकरिता नव्याने सर्व्हे केला जाणार असून, त्यामुळे 28 कि.मी.चे अंतर वाढणार आहे. त्याची निविदा काढली जाईल, त्यानंतर हे काम होईल. त्याचा अहवाल रेल्वे बोर्डाला सादर केला जाईल, असेही लालवाणी यांनी सांगितले. यावेळी रेल्वेच्या पुणे विभागीय प्रबंधक इंदू दुबे, स्वप्नील नीला, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी, जयेश ओस्वाल उपस्थित होते.
अमृत भारत योजनेअंतर्गत कोल्हापूर रेल्वेस्थानकाचाही लूक बदलण्यात येणार आहे. यामध्ये स्थानकवर अत्याधुनिक पद्धतीचा १२ मीटर लांबीचा ब्रीज उभारण्यात येणार आहे. तीन ठिकाणी एक्सलेटर लिफ्ट, आवश्यक ठिकाणी स्वच्छतागृहे, फर्निचर, चार नंबर फलाटावर शेड उभारण्यात येणार आहे. एका वर्षात ही कामे पूर्ण करायची आहेत. यासाठी स्थानकावरील कोणत्या ठिकाणी कोणत्या सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत, याची माहितीही लल्लन यांनी घेतली.
परीख पुलाच्या अलीकडील मार्ग बंद केल्याने राजारामपुरीतून मध्यवर्ती बसस्थानकाकडे येणाऱ्या नागरिकांना धोकादायक परीख पुलाखालूनच यावे लागते. यासाठी येथे पादचारी पूल उभारण्याबाबतही रेल्वे प्रशासनाने सकारात्मकता दर्शविली आहे.