no images were found
‘झेंडा 2′ चित्रपटाविषयी अवधूत गुप्तेची मोठी घोषणा
2009 मध्ये अवधूत गुप्ते दिग्दर्शित ‘झेंडा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरला. प्रेक्षकांनी हा चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतला. तर आता ‘झेंडा 2’ची घोषणा जामनेर येथे झालेल्या एका कार्यक्रमात अवधूत गुप्ते यांनी केली.
‘झेंडा’ हा चित्रपट शिवसेना- मनसे या दोन पक्षातला आणि ठाकरे कुटुंबातला राजकीय थरारावर आधारीत होता. मराठी चित्रपटसृष्टीत हा एक अत्यंत महत्वाचा चित्रपट मानला जातो. विशेष बाब म्हणजे हा अवधूत गुप्ते यांचा हा पहिला दिग्दर्शित चित्रपट. या चित्रपटानंतर अनेक चित्रपट त्यांनी केले.
प्रक्षकांना आता ‘झेंडा 2’ ची प्रतीक्षा होती. जामनेर येथे झालेल्या एका कार्यक्रमात अवधूत गुप्ते याने ‘झेंडा 2’ बाबत घोषणा केली. अवधूत गुप्तेच्या गायनाचा कार्यक्रम जामनेर येथे भाजप नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यातर्फे पार पडला. या कार्यक्रमात स्वगत व्यक्त करताना त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली.
बोलताना ते म्हणाले, ‘कार्यकर्ते जेवढे हतबल असतात तितकाच नेता हतबल असतो हे दाखवणारा झेंडा-2 चित्रपट असू शकतो. जळगाव जिल्ह्याला गिरीश महाजन सारखं नेतृत्व लाभलेले आहे. भाजपातील ज्येष्ठ नेत्यांपैकी ते एक आहेत. त्यांना या प्रवासात घरापासून पक्षापासून अनेक आव्हानांचा, विरोधाचा सामना करावा लागला. त्यामुळे गिरीश महाजन यांच्या राजकीय संघर्षावर भविष्यात झेंडा चित्रपट करण्याची माझी इच्छा आहे.’ असे अवधूत गुप्ते यांनी जाहीर केले.