
no images were found
बॉलिवुड अभिनेता जयदीप अहलावत आहे दरोगा हप्पू सिंगचा चाहता!
एण्ड टीव्हीवरील मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मध्ये दरोगा हप्पू सिंगच्या विनोदी भूमिकेसाठी लोकप्रिय योगेश त्रिपाठी त्यांच्या अद्वितीय विनोदी शैलीसह प्रेक्षकांना हसवून-हसवून लोटपोट करत आहेत. टेलिव्हिजनवरील तणाव दूर करणारी भूमिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या कॉमिक टाइमिंग आणि मोहकतेने अनेक चाहत्यांचे मन जिंकले आहे. पण, तुम्ही प्रशंसा करणाऱ्या सिताऱ्याकडून प्रशंसा केली जात असेल तर तुमच्या प्रवासामधील तो विशेष विजय आहे. असाच क्षण योगेश यांच्याबाबतीत घडला, जेथे सुप्रसिद्ध बॉलिवुड अभिनेते जयदीप अहलावत यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले. या संस्मरणीय क्षणाबाबत सांगताना योगेश त्रिपाठी म्हणाले, ”मी जयदीप अहलावतजी यांचा निस्सीम चाहता आहे. मी त्यांचे काम पाहिले आहे आणि त्यांच्या अनेक मालिका पुन्हा-पुन्हा पाहतो. गंभीर भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करू शकणारे अत्यंत कमी कलाकार आहेत आणि ते त्यांच्यापैकी एक आहेत. अचंबित करणारी बाब म्हणजे, मी एका इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पाहिला, ज्यामध्ये त्यांनी उल्लेख केला होता की ते आमची मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’ पाहतात. त्या क्षणापासून, मी त्यांना भेटण्याची आणि व्यक्तिश: त्यांचे आभार मानण्याची वाट पाहत होतो. गेल्या आठवड्यात तो दिवस अखेर आला.” अभिनेता पुढे म्हणाले, ”मालिकेमध्ये माझ्या मुलीची भूमिका साकारणारी सोनल पनवारने (मलायका) मला सांगितले की, जयदीप अहलावत सेटवर आपल्याला भेटायला आले आहेत. जयदीपजी आमच्या सेटच्या जवळ प्रोजेक्टसाठी शूटिंग करत होते. ते आम्हाला भेटण्यासाठी आले होते. मी त्या दिवशी लवकर पॅक-अप केले, पण त्यांची वाट पाहिली. मी त्यांना भेटण्याची संधी एकदा गमावली होती, ज्यामुळे पुन्हा संधी गमवायची नव्हती. त्यांना माझी भूमिका दरोगा हप्पू सिंग खूप आवडते हे त्यांच्याकडून ऐकण्याचा अनुभव अद्भुत होता. मला खूप आनंद झाला आणि मी त्यांना सांगितले मी त्यांच्या कामाचा निस्सीम चाहता आहे. तो चाहता चाहत्याला भेटण्याचा क्षण होता.”
जयदीप यांच्याबाबत अधिक सांगताना योगेश म्हणाले, ”याआधी, मी त्यांना प्रतिभावान अभिनेता म्हणून ओळखत होतो, पण त्यांच्यासोबत लहान भेटीमधून मला ते किती चांगले व्यक्ती आहेत हे समजले. त्यांचे पाय आजही जमिनीवर आहेत आणि त्यांना कलेबाबत सखोल माहिती आहे. आम्ही एकत्र काही क्षण व्यतित केले, जे अद्भुत व धमाल होते. मी त्यांच्यासोबत काही फोटो काढून क्षण कॅप्चर केले. सेटवरील त्यांच्या उपस्थितीने कलाकार व टीममध्ये उत्साह निर्माण केला. सर्वजणांनी एकत्र येऊन फोटो काढले आणि मजेशीर गप्पागोष्टी केल्या. तो दिवस हास्य, साहचर्य आणि परस्पर आदराने भरलेला होता. जयदीपजींच्या भेटीने मला आमच्या कामाच्या इतरांवरील प्रभावाची आणि त्यामधून निर्माण होऊ शकणाऱ्या सुरेख संबंधांची आठवण करू दिली. अभिनय कलेची खऱ्या अर्थाने जाणीव आणि कदर करणाऱ्या व्यक्तीचे यजमानपद भूषवणे हा खरोखरंच सन्मान होता. या भेटीने मला खूप आनंद होण्यासोबत यशाची जाणीव झाली.”