
no images were found
भाऊबीजेच्या तयारीत असताना चहा पिताच सख्ख्या भावांसह चौघांचा मृत्यू
नवी दिल्ली : मैनपुरी (उत्तर प्रदेश) येथील एका घरी भाऊबिजेदिवशी घडलेल्या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला आहे. या चौघांचाही मृत्यू चहा पिल्यानंतर झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे ऐन भाऊबीजेच्या दिवशी या कुटुंबावर दु:खाचा दु:खाचा डोंगर कोसळला. दोन सख्ख्या भावांसह चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून चौघांचा मृत्यू चहा प्यायल्याने झाला असल्याचे समजते. मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश आहे.
समजलेली माहिती आशी की, गुरुवारी सकाळी नागला कन्हई गावातील शिवानंदन यांच्या घरी भाऊबीजेची तयारी सुरू होती. शिवानंदन यांचे सासरे रवींद्र सिंह (रा. फिरोजाबाद) हे त्यांच्या घरी आले होते. सर्वजण चहा पिण्यासाठी एकत्र बसले होते. चहा पिऊन झाल्यानंतर रवींद्र सिंह यांची तब्येत अचानक बिघडून ते बेशुद्ध पडले. त्याचवेळी सहा वर्षाचा मुलगा शिवानंद आणि पाच वर्षाचा दिव्यांश यांचीही प्रकृती बिघडली. तातडीने सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले. दरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाला. सदर घटनेत एकूण चौघांचा मृत्यू झाला. घटनास्थळी ताबडतोब पोलीस दाखल झाले असून पुढील तपास औंचा पोलीस ठाणे पोलीस करीत आहेत.
चहा बनवणाऱ्या महिलेकडून चहापत्ती ऐवजी चहा बनवताना किटकनाशक पडल्यामुळे चहातून विषबाधा झाल्याची ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.