
no images were found
कोयना धरण परिसरात भूकंपाचे धक्के
सातारा : सातारा येथील कोयना धरण परिसरात आज सकाळी भूकंपाचे धक्के बसले. आज सकाळी ६.३० च्या सुमारास हे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणाच्या हेळबाग परिसरात असल्याची माहिती मिळाली. दरम्यान सकाळी साडेसहाच्या दरम्यान जाणवलेले भूकंपाचे धक्के २.८ रिश्टर स्केल इतके होते. या भूकंपामुळे कोणतीही जीवित व वित्त हानी झाली नसल्याचे वृत्त आहे.