no images were found
कोल्हापूर-सांगली रस्त्यासाठी नवा ठेकेदार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली माहिती
कोल्हापूर-सांगली या रस्त्याचे अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या कामासाठी आता नवा ठेकेदार नेमण्यात येऊन हे काम युद्धपातळीवर करण्याचे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.याबाबतची माहिती भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.शिरोली पुलापासून ते सांगलीमधील अंकली या 34 किमी रस्त्याच्या चौपदरीकरणाचा खर्च 840 कोटींचा आहे. नितीन गडकरी कर्नाटकातून कोल्हापुरात पोहोचले. खासदार महाडिक बोरगावहून त्यांच्यासोबत कोल्हापूर विमानतळापर्यंत सोबत होते.कोल्हापूरपर्यंतच्या प्रवासात गडकरी यांनी महाडिक यांच्याशी कोल्हापुरातील रस्ते आणि विमानतळासंदर्भात चर्चा केली.
गेल्या अनेक वर्षांपासून बीओटी तत्त्वावर काम करणाऱ्या सांगली-कोल्हापूर रस्त्याचे ठेकेदार न्यायालयात गेल्याने रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अर्धवट आहे. वाढत्या रहदारीमुळे अपघातांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे हा मार्ग जीवघेणा झाला आहे. हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला आहे. अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या या रस्त्यासाठी आता नवा ठेकेदार नेमण्यात येऊन हे काम युद्धपातळीवर करण्याचे आदेश केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिले. दरम्यान, कोल्हापूर विमानतळ मार्गाच्या चौपदरीकरणासाठी खासदार धनंजय महाडिक आग्रही आहेत. यासंदर्भात त्यांनी गडकरींशी चर्चा केली.