
no images were found
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांसाठी आज सकाळी दहा वाजता संपूर्ण जिल्ह्यासह कोल्हापूर शहर शंभर सेकंद स्तब्ध राहिलं.
कोल्हापूर : आधुनिक भारताच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे आणि सामाजिक क्रांतीचे प्रणेते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना 101 व्या स्मृतिदिनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात आहे त्या ठिकाणी शंभर सेकंद स्तब्ध राहून अभिवादन करण्यात आलं.
तत्पूर्वी राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळावर
जिल्हा प्रशासनाच्या वतीनं राज्याचे शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते पुष्प वाहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी श्रीमंत शाहू महाराज, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, संभाजी राजे छत्रपती यांच्यासह अनेक मान्यवर आणि शाहू प्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
विविध सामाजिक संस्था संघटनांच्या वतीनं यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीच्या सांगते निमित्त
जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आज पासून 14 मे पर्यंत राजर्षी शाहू कृतज्ञता पर्वाचं आयोजन करण्यात आलं आहे.
त्याचा प्रारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शाहू छत्रपती मिल इथं करण्यात आला.