
no images were found
अमित शहा यांनी चंद्रकांत पाटील यांना समज
कोल्हापुरी – आपल्या वक्तव्याबद्दल कायम चर्चेत असलेले दादा आता मात्र अडचणीत आले आहेत राज्यातील भाजपाने आधीच हात वर केले असताना केंद्रातील भाजपाचे हाय कमांड व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर नाराज असल्याचे दिसून येत आहे. येणाऱ्या काळात लोकसभा व विधानसभा या निवडणुका आहेत त्यामुळेवादग्रस्त वक्तव्य टाळा.. अशी ताकीद अमित शहा यांनी केली.
भाजपाचे आमदार आशिष शेलार यांच्याकडे हा निरोप आल्याचे समजते. आशिष शेलार हे दिल्लीच्या दौऱ्यावरती होते या दरम्यान त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत उद्धव ठाकरे व शरद पवार भेट लोकसभा व विधानसभा निवडणुकीची तयारी यासोबत चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर चर्चा झाली. यावर अमित शहा यांनी पाटील यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजगी व्यक्त करत अशी वक्तव्य टाळण्याची सक्त ताकीत चंद्रकांत पाटील यांना केली. तसेच फक्त केंद्र व राज्य सरकार यांच्या कामावर बोलावे असे निर्देश अमित शहा यांनी दिले आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील याना इथून पुढे वक्तव्य करताना केंद्रीय नेतृत्वाने दिलेल्या ताकीतची आठवण ठेवूनच बोलावं लागनार.