Home मनोरंजन कानेटकरांच्या घरात चोरांचा धुमाकूळ!

कानेटकरांच्या घरात चोरांचा धुमाकूळ!

3 second read
0
0
102

no images were found

कानेटकरांच्या घरात चोरांचा धुमाकूळ!

स्टार प्रवाहच्या ठिपक्यांची रांगोळी मालिकेत अप्पू आणि शशांकच्या नात्यातला दुरावा कमी होतोय. एकमेकांवरच्या प्रेमाची दोघांना जाणीव होतेय. पुन्हा एकदा नव्याने या दोघांच्या आयुष्याची सुरुवात होणार आहे. कानेटकर कुटुंबाने अप्पू-शशांकच्या पुनर्विवाहाचा निर्णय घेतला आहे. लवकरच कानेटकर कुटुंबात दोघांच्या लग्नाची लगबग सुरु होईल. एकीकडे लग्नाची लगबग सुरु असतानाच कानेटकर कुटुंबातील तीन चोरांचा प्रवेश नवी डोकेदुखी ठरणार आहे. कानेटकर कुटुंबाचे दागिने चोरण्याच्या हेतूने हे तीन चोर दाखल झालेत. शकुंतला, छोटू आणि विनू अशी या तीन चोरांची नावं असून वेडिंग प्लॅनर बनून ते कानेटकरांच्या घरात घुसणार आहेत. आरती सोळंकी, भूषण धुपकर आणि ऋषिकेश वामगुडे हे तीन लोकप्रिय कलाकार या तीन इरसाल चोरांच्या भूमिकेत दिसतील.

अप्पू-शशांकच्या पुनर्विवाहाची धामधूम आणि या शुभकार्यात चोरांचा धुमाकूळ असं धमाकेदार वळण ठिपक्यांची रांगोळी मालिकेच्या यापुढील भागांमध्ये पहाता येणार आहे. तेव्हा मनोरंजनाने परिपूर्ण असे ठिपक्यांची रांगोळीचे यापुढील भाग न चुकता पहा सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला

एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला विशाखाप…