no images were found
पीएमस्वनिधी योजना व दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियाना
कोल्हापूर : पीएम स्वनिधी योजना व दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियाना अंतर्गत शहरातील 371 फेरीवाल्यांना, 30 बचत गटांना व्यवसायिक कर्ज व 9 बचत गटांना फिरता निधी वितरीत करण्यात आला आहे. राज्य शासनामार्फत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दि15 मार्च 2023 ते 15 जून 2023 या कालावधीत शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविला जात आहे. या कालावधीमध्ये नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हा उद्देश्य आहे. महानगरपालिका राबवित असलेल्या पी.एम.स्वनिधी आणि दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या माध्यमातून प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.
शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत दि.29 मे 2023 अखेर पी एम स्वनिधी योजनेंतर्गत प्रथम कर्ज 140 फेरीवाल्यांना रु.10000/-रु प्रमाणे रु.14,00,000/- (चौदा लाख रु फक्त) कर्ज, द्वितीय कर्ज 103 फेरीवाल्यांना रु.20000/- प्रमाणे असे रु.20,60,000/- (वीस लाख साठ हजार रुपये फक्त) कर्ज व तृतीय कर्ज 128 फेरीवाल्यांना रु.50000/- प्रमाणे रु.64,00,000/- (चौसष्ट लाख रुपये फक्त) कर्ज असे तिन्ही मिळून 371 फेरीवाल्यांना 98,60,000/- (अठ्यान्नव लाखसाठ हजार रु फक्त) कर्ज बँकेमार्फत वितरीत करण्यात आले आहे. तर दीनदयाळ अंत्योदय योजना -राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियाना अंतर्गत दि.29 मे 2023 पर्यंत 30 बचत गटांना रु.1,41,43000/- (एक कोटी एकेचाळीस लाख त्रेचाळीसहजार रु फक्त) व्यवसायिक कर्ज वितरीत करण्यात आले आहे. या 9 बचत गटांना प्रत्येकी रु.10000/- प्रमाणे रु.90000/- फिरता निधी वितरीत करण्यात आला आहे. तरी या योजनांचा जास्तीत जास्त पथविक्रेते, महिला बचत गट व अनुषंगिक लाभार्थी, नागरिक यांनी लाभ घ्यावा असे आवाहन उपआयुक्त शिल्पा दरेकर यांनी केले आहे.