no images were found
४१२ अभ्यासक्रमांचे निकाल घोषित
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या ऑक्टोबर/नोव्हेंबर-२०२२ हिवाळी सत्रातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या दि. ०२ जानेवारी, २०२३ पासून व्यवस्थितपणे सुरु झालेल्या आहेत. दि. १२ एप्रिल, २०२३ रोजी Bachelor of Laws(Special) या अभ्यासक्रमा परीक्षा वर्णनात्मक(offline) पध्दतीने विविध महाविद्यालये व अधिविभागामध्ये सुरळीतपणे पार पडल्या आहेत. दि. १२ एप्रिल, २०२३ रोजी M.Tech. Sem.III, M.Tech.Sem.I, M.C.A.Sem.I,
B.C.A. Sem.I, M.Sc. Nano Tech.Sem I, M.Sc.Physics Sem.I, M.Sc.Physics Sem.II, M.Sc. Zoology Sem.I, M.Sc.Zoology Sem.II, B.Sc.Food Science Sem.I या १० अभ्यासक्रमांचे निकाल घोषित झाले असून आजअखेर एकूण ४१२ अभ्यासक्रमांचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. या परीक्षेसाठी विद्यापीठाने परीक्षेत गैरप्रकार करणा-या विद्यार्थ्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथके स्थापन केली आहेत. सदर पथकाकडून दि. १२ एप्रिल, २०२३ रोजी कोल्हापूर – ५ व सांगली-३ या दोन जिल्ह्यातून एकूण ८ गैरप्रकाराची नोंद परीक्षा प्रमाद समितीतर्फे करण्यात आलेली आहे. सातारा जिल्ह्यातून कोणत्याही गैरप्रकाराची नोंद परीक्षा प्रमाद समितीतर्फे करण्यात आलेली नाही. तसेच परीक्षेचे पावित्र्य राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणेच परीक्षा द्यावी, असे आवाहन मा. संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांनी केले आहे