Home मनोरंजन आशी सिंगने साकारला ‘धवनी’चा दाक्षिणात्य लूक!

आशी सिंगने साकारला ‘धवनी’चा दाक्षिणात्य लूक!

7 second read
0
0
24

no images were found

आशी सिंने साकारला ‘धवनी’चा दाक्षिणात्य लूक!

प्रसारणास प्रारंभ झाल्यापासूनच ‘झी टीव्ही’वरील ‘मीत’ या मालिकेने प्रेक्षकांच्या हृदयात आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. मालिकेतील मीत हूडा (आशी सिंग) ही नायिका काम आणि जबाबदारी देताना होणार्‍्या स्त्री-पुरुष भेदभावाविरोधात संघर्ष करणार्‍्या अनेक महिलांचे प्रतिनिधित्त्व करते आणि महिला पार पाडू शकत नाहीत, अशी कोणतीही जबाबदारी आणि काम हे अस्तित्त्वातच नाही, हे सिध्द करते. आता या मालिकेच्या कथानकाचा काळ एका वर्षाने पुढे नेण्यात आल्यानंतर त्यात आशी सिंग ही मीत हूडाची, तर शगुन पांडे मनमीतची भूमिका रंगवत आहे. पण कथानकाला मिळालेल्या कलाटण्यांमुळे या मालिकेने प्रेक्षकांमधील उत्कंठा खूपच वाढवत नेली आहे.

मीतच्या अलीकडच्या भागांमध्ये पाहिले की शगुन (सुमित सिंग) हा मनमीतवर कसा हल्ला करतो. पण सरकारना (मनमीतचे वडील) जेव्हा कळते की खोट्या वेशातील मीतनेच मनमीतवर हल्ला केला होता, तेव्हा ते तिचे अपहरण करतात. पण आपले निर्दोषत्व सिध्द करून खर्‍्या गुन्हेगाराला सर्वांसमोर आणण्यासाठी मीत हूडा सरकारच्या तावडीतून सुटका करून घेते आणि मीनाक्षी अशा नावाने एका दाक्षिणात्य मुलीच्या रूपात सागवान हाऊसमध्ये आश्रय घेते. दाक्षिणात्य मुलीचे रूप हुबेहुब साकारण्यासाठी आशी सिंगने स्वत:त पूर्ण परिवर्तन केले. किंबहुना ‘धवनी’ वेषात ती आशी सिंग आहे, हे ओळखताच येत नाही. तिचे लांब, कुरळे केस, सावळा रंग, जोडलेल्या भुवया आणि नाकावरील चष्मा यामुळे ती आशी सिंग आहे, हे ओळखताच येत नाही. आपल्या या नव्या अवतारावर आशी सिंग खूप खुश असून या मुलीची व्यक्तिरेखा अस्सलपणे उभी करण्यासाठी ती बरीच मेहनतही घेत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…