no images were found
मंदिरावर निंबाचं झाड कोसळल्याने मोठी दुर्घटना
अकोला : अकोला शहरातील पारस परिसरातील बाबूजी महाराज मंदिरात आरती सुरू असतानाच टिनशेडवर झाड कोसळून आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे हे झाड कोसळलं आणि टिनशेडखाली थांबलेले 40 ते 50 जण दबले गेले.
या दुर्घटनेत आतापर्यंत 3 जण गंभीर जखमी झाल्याचं समोर आलं आहे. तर 20 किरकोळ जखमींना बाहेर काढण्यात यश आलं आहे. त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होतं.
दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय अधिकारी, बाळापूर पोलीस, तहसीलदार, पारस औष्णिक विद्युत केंद्रातील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. निंबाचं झाड पडून झालेल्या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. संध्याकाळी बाबूजी मंदिरात आरती सुरू होती, तेव्हा वादळी वारा सुरू झाला आणि अचानक यादरम्यान मंदिराला लागून असलेलं भल मोठं कडूलिंबाचे झाड अचानक उन्मळून टिनाच्या शेडवर कोसळले. बाळापूर पारस आणि शेळद फाटा पारस रस्त्यावर वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झाडं उन्मळून पडली. त्यामुळे रुग्णवाहिका वेळेवर पोहोचण्यात अडचणी आल्या. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं धुमशान घातलं आहे.