no images were found
लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिराच्या विकासासाठी निधी उपलब्ध व्हावा :- जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे
कोल्हापूर : जरग नगर येथील कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या श्रीमती लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर या शाळेने आपली नवी ओळख निर्माण करीत कोल्हापूरातील अन्य शाळांना आदर्श निर्माण केला आहे. याठिकाणी बालवाडीपासून सातवी पर्यंत विद्यार्थांना शिक्षण दिले जाते. शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी स्कॉलरशीप, क्रीडा अशा विभागांत भरघोस यश संपादन केले आहे. प्रायव्हेट शाळांच्या बरोबरीने या शाळेमध्ये प्रवेश मिळण्यासाठी पालकांना प्रतीक्षा करावी लागते.
कोल्हापूरचे पालकमंत्री मा.दिपक केसरकरसो कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी त्यांची भेट घेऊन या शाळेच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून
देण्याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले व शाळेस भेट देऊन शाळेची सध्याची आवश्यकता असलेले क्रीडांगण त्वरीत विकसीत करून मिळावे व १० वर्ग खोल्या नवीन बांधून मिळाव्यात अशा आशयाचे निवेदन पालकमंत्री यांना दिले. मा.दिपक केसरकरसो यांनी या शाळेसाठी जे आवश्यक आहे ते सर्व करू असे आश्वासन दिले.