no images were found
समाज कल्याण विभागामार्फत 01 एप्रिल ते 1 मे या कालावधीत सामजिक न्याय पर्व म्हणून साजरा कण्यात येणार– विशाल लोंढे
कोल्हापूर : सहायक आयुक्त, समाज कल्याण कोल्हापूर कार्यालयामार्फत दि.०१ एप्रिल ते दि.०१ मे २०२३ या कालावधीत सामाजिक न्याय पर्व म्हणून साजरा करण्यात येणार आहे. सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामार्फत व लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र, राधानगरी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधानात समाविष्ठ असणाऱ्या विविध मुल्यांचा समाजात प्रसार व्हावा, विदयार्थी दशेत संविधानातील हक्क व सुजान नागरीक म्हणून असणाऱ्या आपल्या जबाबदाऱ्या विदयार्थ्यांना समजाव्यात यासाठी दिनांक ०५ एप्रिल २०२३ रोजी यशवंतराव चव्हाण (KMC) कला, वाणिज्य व विज्ञान महाविदयालय गंगावेस कोल्हापूर येथे संविधान प्रबोधन संवाद उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.
यावेळी सहायक आयुक्त, विशाल लोंढे, महाविदयालयाचे प्राचार्य ए व्ही पौडमल व लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र राधानगरीचे संवादक कृष्णात स्वाती आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात संविधान संवादक कृष्णात स्वाती (सदस्य, लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र) यांनी विदयार्थ्यांशी संविधानातील मुल्यांबाबत संवाद साधला. याप्रसंगी संविधानाच्या मुल्यांचा स्वीकार करुन विदयार्थ्यांनी आपले भविष्य घडवावे, सुजाण नागरिक व्हावे, असे प्रतिपादन सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले. बी एम पाटील यांनी सुत्रसंचालन केले तर एस एस गावीत यांनी आभार मानले.
या कार्यक्रमात विदयार्थ्यांनी मोठया उत्साहाने सहभाग नोंदविला. सामाजिक न्याय पर्वातंर्गत साजऱ्या होणाऱ्या विविध कार्यक्रमात विदयार्थ्यांनी मोठया प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहनही श्री. लोंढे यांनी केले आहे.