Home राजकीय भारतीय जनता पार्टीच्यावतीने स्थापना दिन उत्साहात संपन्न

भारतीय जनता पार्टीच्यावतीने स्थापना दिन उत्साहात संपन्न

4 second read
0
0
72

no images were found

भारतीय जनता पार्टीच्यावतीने स्थापना दिन उत्साहात संपन्न

कोल्हापूर :   आज ६ एप्रिल भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस. भाजपा कोल्हापूरच्यावतीने पक्षाचा स्थापना दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भाजपा बिंदू चौक येथील कार्यालयात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भारतमाता प्रतिमा पूजन व ध्वजवंदन करण्यात आले. भारत माता की जय, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. उपस्थित सर्वाना पेढे वाटण्यात आले.

     यानंतर भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नद्डा व पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांनी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांना संबोधित करणारे भाषण बिंदू चौक येथील कार्यालयात सर्वांनी एकत्र येऊन एकले.

यावेळी जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, प्र.का.सदस्य महेश जाधव, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस दिलीप मेत्रानी, विजय जाधव, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, अमोल पालोजी, सुनीलसिंह चव्हाण, विजय आगरवाल, अजित ठाणेकर, विजय सूयर्वंशी, वीजयसिंह खाडे-पाटील, गिरीश साळोखे, रमेश दिवेकर, सुधीर देसाई, सचिन सुतार, प्रकाश घाटगे, रशीद बारगीर, महेश यादव, प्रमोदिनी हर्डीकर, भरत काळे, अमेय भालकर, विवेक वोरा, गौरव सातपुते, रोहित कारंडे, डॉ गुरव, नरेंद्र पाटील, मानसिंग पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…