no images were found
महापालिकेत सामूहिक राष्ट्रगीत गायन संपन्न
कोल्हापूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त व स्वराज्य महोत्वाअंतर्गत महानगरपालिकेच्या वतीने महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात सकाळी 11 वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायन उत्साहात संपन्न झाला. सकाळी ठिक 11 वाजता अग्निशमन विभागाच्यावतीने सायरन वाजविण्यात येऊन हे राष्ट्रगीत गायन करण्यात आले. त्याचबरोबर महापालिकेच्या वर्कशॉप शाळेमध्ये व इतर कार्यालयातही राष्ट्रगीत गायन करण्यात आले. यावेळी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई, उप-आयुक्त शिल्पा दरेकर, सहा.संचालक नगररचना रामचंद्र महाजन, मुख्य लेखापरिक्षक मिलींद कुलकर्णी, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजित घाटगे, आरोग्याधिकारी डॉ.रमेश जाधव, मुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, नगरसचिव सुनिल बिद्रे, उप-शहर अभियंता एन.एस. पाटील, नारायण भोसले, बाबूराव दबडे, अंर्तगत लेखापरिक्षक प्रशांत पंडत, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.