
no images were found
सुनावणी वेळेवरच होणार, सुप्रीम कोर्टाने शिवसेनेची मागणी फेटाळली
नवी दिल्ली : शिवसेना आणि शिंदे गटाची न्यायालयीन लढाई आता निर्णायक टप्प्यावर आली असून 22 ऑगस्टला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. पण, निवडणूक आयोगाने 19 तारखेपर्यंत मुदत दिल्यामुळे शिवसेनेनं सुनावणी घेण्याची विनंती केली. पण सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची मागणी फेटाळली असून वेळेवरच सुनावणी होणार आहे.
शिवसेना कुणाची? या प्रश्नाचे उत्तर अजूनही अनुत्तरीत आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणी पाच याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलत 22 ऑगस्टला सुनावणी ठेवली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन आठवड्यात कागदपत्रे सादर करण्याचे आदेश शिवसेनेला दिले होते. आयोगानं ठाकरे गटाला २ आठवड्याची मुदत दिली होती. पण, शिवसेनेनं 4 आठवड्यांची मुदत मागितली होती. पण आयोगाने शिवसेनेची 4 आठवड्याची मागणी फेटाळली होती. २३ ऑगस्टपर्यंत कागदपत्रे सादर करण्याचे आयोगाचे आदेश कायम आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय निर्णय देतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.