
no images were found
लवकरच 5G होणार दाखल : पंतप्रधान
नवी दिल्ली : देशातील नेट युजर्स गेल्या कित्तेक दिवसापासून 5G सेवेची प्रतीक्षा करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना म्हणाले कि, आता देशात 5G टेक्नोलॉजीची प्रतीक्षा संपणार असून लवकरच डिजिटल इंडिया मोहिमेचा फायदा देशातील प्रत्तेक गावापर्यंत पोहोचवला जाईल. भारतातील प्रत्तेक गावापर्यंत इंटरनेट पोहोचवले जाणार असून खेड्यांना ऑपटिकल फायबर व इंटरनेटचा अक्सेस दिला जाणार आहे. देशात सध्या जिओ व ऐअरटेलकडून 5G सेवा सुरु केली जाऊ शकते. या कंपन्यांचीही तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.