no images were found
पीअॅण्डजी शिक्षाच्या प्रोजेक्ट प्रगतीची डिजिटल अपस्किलिंगच्या माध्यमातून डिजिटल समावेशन व सक्षमीकरणाच्या दिशेने वाटचाल
मुंबई: प्रॉक्टर अॅण्ड गॅम्बल इंडिया (पीअॅण्डजी इंडिया) या जिलेट, ओरल-बी, व्हिस्पर इ. ब्रॅण्ड्सच्या उत्पादक कंपनीने आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त सांगितले की, कंपनी त्यांचा प्रमुख कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रम पीअॅण्डजी शिक्षाचा भाग म्हणून ‘प्रोजेक्ट प्रगती’च्या माध्यमातून वंचित महिला व ट्रान्सजेंडर समुदायाला अपस्किल करत आहे. प्रोजेक्ट प्रगती हा वंचित महिला व ट्रान्सजेंडर समुदायासाठी विशेष डिजिटल अपस्किलिंग उपक्रम आहे.
नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (एनएफएचएस) (२०२०-२१) नुसार, भारतात शहरी भागांमधील ७० टक्के महिला इंटरनेटचा वापर करतात, तुलनेत ग्रामीण भागात ४९.६ टक्के महिला इंटरनेटचा वापर करतात. यामधून महिलांमध्ये डिजिटल साक्षरतेमधील मोठी लैंगिक तफावत दिसून येते, जी शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागांमध्ये सर्वाधिक आहे. ही बाब लक्षात प्रथम इन्फोटेक फाऊंडेशन व हमसफर ट्रस्टसोबत सहयोगाने पायलट म्हणून सादर करण्यात आलेल्या या उपक्रमाचा वंचित समुदायांची रोजगारक्षमता वाढवण्याचा, त्यांना स्वावलंबी भविष्यासाठी सक्षम करण्याचा आणि तंत्रज्ञान युगामध्ये महत्त्वपूर्ण बनलेल्या मुलभूत डिजिटल कौशल्यांसह सुसज्ज करण्याचा मनसुबा आहे. पायलटचा भाग म्हणून या उपक्रमाने ६०० हून अधिक महिला व ट्रान्सजेंडर्सच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे, ज्यामधून देशामध्ये व देशाबाहेर सर्वांसाठी समान व सर्वसमावेशक विश्व निर्माण करण्याप्रती पीअॅण्डजी इंडियाची कटिबद्धता दिसून येते.
तसेच कंपनीच्या सीएसआर प्रयत्नांना पाठिंबा देत कंपनीचे कर्मचारी स्वयंसेवक म्हणून देखील कार्य करतात आणि ते कार्यरत असलेल्या भागांमधील समुदायांना डिजिटल अपस्किलिंग प्रशिक्षण देतात, ज्यामुळे समुदाय सामाजिकदृट्या व आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासह त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध होतात. याव्यतिरिक्त, प्रोजेक्ट प्रगतीने १ लाख व्यक्तींच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे, ज्यामध्ये शालेय विद्यार्थीनी, आयटीआय महाविद्यालयांमधील पदवीधर विद्यार्थी, वंचित महिला आणि ट्रान्सजेंडर समुदायामधील लाभार्थी यांचा समावेश आहे. हा उपक्रम बाह्य सहयोगींसोबत सहयोग करत अनेक कोर्सेसमधील कौशल्य-आधारित प्रमाणन देखील देतो आणि आपली पोहोच व प्रभाव वाढवत आहे.
पीअॅण्डजी इंडियाने नुकतेच एनजीओ सहयोगी व कर्मचारी स्वयंसेवकांसोबत सहयोगाने प्रोजेक्ट प्रगतीचा भाग म्हणून पुढील ५ वर्षांमध्ये वंचित समुदायांमधील ५ लाख महिलांना डिजिटल अपस्किलिंग संधी प्रदान करण्याप्रती कटिबद्ध असल्याची घोषणा केली. यामागे एसटीईएम क्षेत्रांमध्ये समानता व सर्वसमावेशकतेला चालना देण्याचा मनसुबा आहे.