
no images were found
२१ ऑगस्ट ते २० सप्टेंबर दरम्यान कॉंग्रेसला मिळणार नवीन अध्यक्ष
नवी दिल्ली : अखेर कॉंग्रेसला नवीन अध्यक्ष मिळणार आहे त्यानिमित्ताने गेल्या काही वर्षापासुनचा अध्यक्षपदाचा कॉंग्रेसचा शोधही थांबणार आहे. येत्या २१ ऑगस्टपासुन नव्या अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरु होणार आहे. ही प्रक्रिया २० सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. म्हणजे पुढच्या एप्रिल महिन्यात कॉंग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार आहे. या अध्यक्षपदाच्या रेसमध्ये कोण कोण असणार आहे? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, राहुल गांधी यांनी अध्यक्ष पदाची निवडणूक न लढविल्यास गांधी घराण्याबाहेरची व्यक्ती कॉंग्रेसची अध्यक्ष होण्याची श्यक्यता अधिक वर्तविली जात आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. तसेच राहुल गांधी हे निवडणूक लढविणार कि नाही हे सुधा येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. त्यांनी हि निवडणूक न लढविल्यास काँग्रेस नेते प्रियांका गांधी (वडेरा) यांना हि निवडणूक लढविण्याची गळ घालण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगितले जात आहे.