
no images were found
आझादी का अमृत महोत्सवाअंतर्गत केशवराव भोसले नाट्यगृह येथे सांस्कृतीक कार्यक्रम संपन्न
कोल्हापूर : आझादी का अमृत महोत्सवाअंतर्गत महानगरपालिकेच्या वतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम संगीत सुर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांनीही देशभक्तीपर गीतांवर आपला नृत्य सादर केला. या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे, उपायुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय वनकुंद्रे व पंडीत कंदले यांनी केले. तर नेटके नियोजन सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर मदन ठाणेकर यांनी केले. तर सुतार बंधु झंकार बिट्स ऑर्केस्ट्रा यांनी या कार्याक्रमाला संगीत दिले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई, सहाय्यक आयुक्त संदीप घार्गे, सहा.संचालक नगररचना रामचंद्र महाजन, शहर भियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजित घाटणे, उपशहर रचनाकार रमेश मस्कर उपशहर अभियंता एन.एस. पाटील, नारायण भोसले, बाबूराव दबडे, अतंरगत लेखापरिक्षक प्रशांत पंडत, नगरससिव सुनिल बिद्रे, संजय भोसले, कर निर्धारक व संग्रहक सुधाकर चलावड, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.