
no images were found
25 वर्षांपासून तिरंगा फडकवणाऱ्या दरेकर कुटुंबियांच्या घरी जिल्हाधिकारी यांची भेट
कोल्हापूर : मागील 25 वर्षांपासून दरवर्षी स्वातंत्र्यदिनी व प्रजासत्ताक दिनी तिरंगा फडकवणाऱ्या कोल्हापूर येथील अजित दरेकर यांच्या घरी जावून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी राष्ट्रध्वजाला वंदन केले, तसेच कुटुंबियांशी संवाद साधला. दरवर्षी 15 ऑगस्ट व 26 जानेवारी रोजी श्री दरेकर घरासमोर तिरंगा फडकवतात, ही कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘हर घर तिरंगा’ मोहीम देशभरात राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने श्री. दरेकर कुटुंबीय राबवित असलेल्या या उपक्रमात संपूर्ण देशवासिय सहभागी झाले आहेत.