Home शासकीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात संविधान स्तंभाचेही मान्यवरांच्या हस्ते अनावरण

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात संविधान स्तंभाचेही मान्यवरांच्या हस्ते अनावरण

1 second read
0
0
260

no images were found

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात संविधान स्तंभाचेही मान्यवरांच्या हस्ते अनावरण

कोल्हापूर : भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशात सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळाले नसून त्यासाठी स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारकांना प्रदीर्घ लढा द्यावा लागलेला होता. त्यामुळे मिळालेल्या या स्वातंत्र्याला टिकवण्यासाठी व वैभवशाली राष्ट्र निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले, यावेळी श्री शाहू महाराज छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी-पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…