Home राजकीय उद्धव ठाकरे ५ मार्चला कोकण दौऱ्यावर; संजय कदमांचा पक्ष प्रवेश, रामदास कदमांचा समाचार?

उद्धव ठाकरे ५ मार्चला कोकण दौऱ्यावर; संजय कदमांचा पक्ष प्रवेश, रामदास कदमांचा समाचार?

8 second read
0
0
35

no images were found

उद्धव ठाकरे ५ मार्चला कोकण दौऱ्यावर; संजय कदमांचा पक्ष प्रवेश, रामदास कदमांचा समाचार?

मुंबई : . शिवसेनेत फूट पडल्यानंतर आणि महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर प्रथमच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर जात आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिंदे गटात दाखल झालेले माजी मंत्री रामदास कदम यांच्या होम ग्राऊंडवर सभा घेणार आहेत. याच सभेत माजी आमदार संजय कदम करणार ठाकरे गटात जाहीर प्रवेश करणार आहेत. 5 मार्चला उद्धव ठाकरे रत्नागिरीचा दौरा करणार आहेत. संध्याकाळी ५ वाजता उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये सभा होणार आहे अर्थातच उद्धव ठाकरे या दौऱ्यात रामदास कदम यांचा समाचा रघेतल्याशिवाय राहणार नाहीत ?

       या सभेला विनायक राऊत, भास्कर जाधव, सुषमा अंधारे, चंद्रकांत खैरे यांच्यासह नेते उपस्थित राहणार आहेत. याच सभेत माजी आमदार संजय कदम ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत शिवसेनेत संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. मुंबई शहर,पश्चिम आणि पूर्व उपनगरातील विभागप्रमुखांना बदलण्यात आले आहे. आता शिंदे गटाच्या आव्हानानंतर मुंबईतील विभागप्रमुख बदलले आहेत. यामध्ये नव्या तरुणांना संधी दिली आहे. आता संघटनाबांधणीवर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर जात आहेत.

      आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे स्वत: जातीने लक्ष घालत आहेत. ठाकरे यांची तब्बेत बरी नसल्याने त्यांनी महाराष्ट्राचा दौऱ्या टाळला होता. कोकणातील शिवसेनेचा बालेकिल्ला अबाधित राहण्यासाठी पक्षबांधणीकडे लक्ष दिले जात आहे. त्यामुळे मूळचे शिवसेनेचे नेते संजय कदम राष्ट्रवादीत दाखल झालेत. ते दापोली-मंडणगडे राष्ट्रवादीचे आमदार झालेत. त्यानंतर आता शिंदे गटात दाखल झालेले योगेश कदम यांनी संजय कदम यांचा पराभव केला. रामदास कदम हेही शिंदे गटात गेल्याने त्यांना जोरदार टक्कर देण्यासाठी पुन्हा राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि मूळचे शिवसैनिक संजय कदम यांना पक्षात प्रवेश देणार आहे. त्यामुळे दापोली – मंडणगड मतदारसंघात शिवसेना मजबूत होण्यास मदत होईल, अशी ठाकरे गटाची व्युहरचना आहे.

        शिवसेनेत फूट पडल्यानंतर रत्नागिरीतून उदय सामंत आणि खेडमधील योगेश कदम (दापोली-मंडणगड मतदारसंघ) हे विद्यमान आमदार शिंदे गटात दाखल झालेत. त्यामुळे हे दोन्ही मतदारसंघ पुन्हा शिवसेनेकडे आणण्याबाबत ठाकरे गट कामाला लागला आहे. कोकणातील आक्रमक नेतृत्व भास्कर जाधव यांच्यावर कोकणची मोठी जबाबदारी पडण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. त्यामुळे थेट रत्नागिरीतूनही निवडणूक लढवू शकतात, अशीही चर्चा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला खास महत्व प्राप्त झाले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…