no images were found
मौजे सांगाव येथे रस्त्याच्या वादातून झालेल्या मारामारीत शेतकऱ्याचा खून
कोल्हापूर : शेतीच्या रस्त्यावरून झालेल्या वादात कागल तालुक्यातील मौजे सांगाव या गावात शेतकऱ्याचा खून करण्यात झाला. आहे. मारुती हरी पाटील (वय ६५) असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत कागल पोलिस ठाण्यात ७ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी कागल तालुक्यातील मौजे सांगाव येथे शेतातील रस्त्याच्या वादातून झालेल्या मारामारी झाली. यामध्ये ७ जणांनी बेदम मारहाण केल्याने शेतकरी मारुती हरी पाटील हे गंभीर जखमी झाले. यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याबाबत कागल पोलिसांनी सात जणांवर गुन्हा नोंद केला.
मयत मारुती पाटील यांच्या शेतातून मुरूम टाकून रस्ता करत असताना झालेल्या वादातून मारामारी झाली. पाटील यांना काठी व खोऱ्याने मारहाण झाल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, नातवंडे, दोन विवाहित मुली असा परिवार आहे.
कागल पोलिसांनी या प्रकरणी कृष्णात पाटील (वाडकर) एकनाथ केरबा पाटील, रघुनाथ कृष्णात पाटील, महादेव दत्तू पाटील, प्रकाश महादेव पाटील, यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये महिलांचाही समावेश असून अधिक तपास कागल पोलीस स्टेशनच्या उप निरीक्षिक खडके व ठाणे अंमलदार शिंगारे करत आहेत.